ज्ञात्रा फाउंडेशनचा शैक्षणिक उपक्रम

उत्सवबुद्धी

भारतीय उत्सव समजून घेणाऱ्या नव्या पिढीसाठी

प्रत्येक उत्सव, एक नवी पाठशाळा.

भारतीय उत्सवांमागील कथा, शास्त्र, इतिहास, निसर्ग, कला आणि मूल्ये समजून घेऊन उत्सव अधिक अर्थपूर्णपणे साजरा करण्यासाठीचा शैक्षणिक उपक्रम.

पहिला अभ्यासविषय: गणेशोत्सव

उत्सवबुद्धी पुस्तकाचे मुखपृष्ठउत्सव हातात. विचार मनात.
उत्सवबुद्धी म्हणजे काय?

भावना, बुद्धी आणि आचरण यांचा समन्वय

भारतीय उत्सव केवळ साजरे करण्यासाठी नाहीत. त्यांच्या मागे कथा आहेत, शास्त्रीय विचार आहेत, इतिहास आहे, निसर्गाशी नाते आहे आणि जीवनमूल्ये आहेत. मुलांनी उत्सवाचा आनंद घेतानाच त्यामागील विचार समजून घ्यावा, प्रश्न विचारावेत, निरीक्षण करावे आणि स्वतःचे आचरण अधिक सजग करावे, हा उत्सवबुद्धीचा प्रयत्न आहे.

मुलांनी विचारायला शिकावे:
हा उत्सव का साजरा करतो?या परंपरेचा अर्थ काय?शास्त्र आणि इतिहास काय सांगतात?निसर्गाशी याचे नाते काय?आज तो कसा साजरा करावा?माझ्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होतो?
पहिला अभ्यास

गणेशोत्सव

भक्ती, ज्ञान, कला, पर्यावरण, इतिहास आणि सामाजिक जबाबदारी यांचा एकत्र अभ्यास.

भगवान गणेश

स्वरूप, प्रतीके, कथा आणि गुण

शास्त्र आणि अध्यात्म

गणेशतत्त्व, उपासना आणि अथर्वशीर्ष

इतिहास आणि परंपरा

घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव, समाजजागृती

कला आणि आनंद

संगीत, आरती, नृत्य, सजावट आणि पारंपरिक खेळ

निसर्ग आणि पर्यावरण

माती, पाणी, वनस्पती आणि पर्यावरणपूरक उत्सव

समाज आणि सेवा

शिस्त, सहकार्य, सेवा आणि सामाजिक जबाबदारी

Online Learning Program

वयोगटानुसार अध्ययन

९–१३ वर्षे आणि १४–२१ वर्षे या दोन गटांसाठी विषय समान राहतील; प्रश्न, उदाहरणे, कृती आणि चिंतन वयोगटानुसार मांडले जाईल.

१२ अभ्यासपूर्ण Video Sessionsश्रीगणपती अथर्वशीर्षशुद्ध पठण · शब्दार्थ · भावार्थउत्सवबुद्धी पुस्तकप्रश्न आणि कृतीचिंतनमाझा गणेशोत्सव संकल्पसहभाग प्रमाणपत्र
उत्सवबुद्धी पुस्तक
उत्सवबुद्धी पुस्तक

उत्सव हातात. विचार मनात.

गणेशोत्सवामागील कथा, शास्त्र, इतिहास, परंपरा, निसर्ग, कला आणि सामाजिक विचार मुलांना सहज समजतील अशा भाषेत मांडणारे पुस्तक.

हे पुस्तक मुलांना प्रश्न विचारायला, निरीक्षण करायला, चिंतन करायला आणि उत्सवात अर्थपूर्ण सहभाग घ्यायला प्रोत्साहित करते.

पहिल्या टप्प्याचा संकल्प

५०,००० विद्यार्थ्यांपर्यंत उत्सवबुद्धी

५०,०००पुस्तके
५०,०००विद्यार्थी
₹१७५अंदाजित खर्च / विद्यार्थी

गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ५०,००० विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक + अध्ययन + चिंतन + कृती असा संपूर्ण शैक्षणिक अनुभव पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे.

शाळा आणि महाविद्यालयांसाठी

आपल्या संस्थेला सहभागी करा

  • पुस्तक वितरण
  • Online Learning Program
  • विशेष संवाद सत्रे
  • विद्यार्थी उपक्रम आणि संकल्प
संस्थेसाठी माहिती मिळवा →
विद्यार्थ्यांचा समूह
गणेशोत्सवापासून पुढे

प्रत्येक उत्सवाला पुन्हा एकदा पाठशाळा बनवणे.

दीपावली · नवरात्र · मकरसंक्रांत · रामनवमी · गुरुपौर्णिमा · आणि इतर भारतीय उत्सव

ज्ञात्रा फाउंडेशन

उत्सवबुद्धी हा ज्ञात्रा फाउंडेशनचा शैक्षणिक उपक्रम आहे.

ज्ञात्रा फाउंडेशन भारतीय ज्ञानपरंपरा, शिक्षण आणि संस्कार यांचा आजच्या पिढीच्या गरजांशी समन्वय साधणारे विविध शैक्षणिक उपक्रम राबवते.

उत्सवातून ज्ञान. ज्ञानातून संस्कार.

आपल्या मुलाला उत्सव केवळ साजरा करायला नव्हे, समजून घ्यायला शिकवूया.